Main Featured

Lockdown: सेक्स टॉय खरेदीत महाराष्ट्र अव्वल; मुंबई, पुण्याचा हा क्रमांक


सेक्स टॉयसेक्स या विषयाबद्दल चर्चा करायची म्हटली की आज ही भारतीय समाज थोडा विचार करतो. पण करोना व्हायरस रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या लॉकडाउननंतर सेक्स टॉय (Sex toys) च्या विक्रीत अचानक मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यात देशभरात सेक्स टॉयच्या विक्रीत तब्बल ६५ टक्के इतकी वाढ झाल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

'इंडिया अनकवर्ड: इन साइटफुल एनालिसिस ऑफ सेक्स प्रोडक्ट्स ट्रेंड्स इन इंडिया' या ThatsPersonal.comच्या रिपोर्टमध्ये भारतीय बाजारपेठेतील सेक्स खेळणी विक्रीचा अहवाल देण्यात आला आहे. या खेळणीची विक्री आणि ग्राहकांचा कल याबद्दल या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या रिपोर्टची ही चौथी आवृत्ती असून तो २.२ व्हिझिटर आणि ऑनलाइन विक्री होणाऱ्या ३ लाख ३५ हजार वस्तूंच्या अभ्यासानंतर तयार करण्यात आला आहे.

सेक्स टॉयची विक्री करणाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याची सर्वात जास्त खरेदी महाराष्ट्रात झाली आहे. सेक्स टॉयची सर्वाधिक विक्रीतबाबत महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या स्थानावर कर्नाटक तर तिसऱ्या स्थानावर तामिळनाडूचा क्रमांक लागतो.

देशात करोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. जर मेट्रो शहरांचा विचार केल्यास मुंबईत सर्वाधिक सेक्स टॉयची विक्री झाली आहे. देशात मुंबई अव्वल स्थानी आहे. तर बेंगळुरू दुसऱ्या आणि नवी दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे. एनसीआर (राजधानी दिल्ली परिसर) च्या तुलनेत मुंबई महानगर (MMR)मध्ये सेक्स टॉयची विक्री जळजवळ २४ टक्क्यांनी अधिक आहे.

सेक्स टॉयच्या विक्री बाबत देशातील पहिल्या १० शहरांमध्ये पुण्याचा देखील क्रमांक लागतो. पुणे या यादीत आठव्या क्रमांकावर आहे.

या रिपोर्टनुसार प्रति ऑर्डरमागे सर्वाधिक खर्च सुरत शहरातून केला जातो. या शहरातील प्रति ऑर्डरमागे ३ हजार ९०० रुपये खर्च केले जातात. पुरुषांकडून केल्या जाणाऱ्या खरेदीमध्ये उत्तर प्रदेश अन्य सर्व राज्यांच्या तुलनेत आघाडीवर आहे. ThatsPersonal.comचे सीईओ समीर सरैया यांनी सांगितले की, या वस्तूंची बाजारपेठ वेगाने वाढत आहे. ग्राहकांना नवे प्रयोग करायचे आहेत. या रिपोर्टनुसार महिला खरेदीसाठी दुपारी १२ ते ३ ही वेळ निवडतात तर पुरुष रात्री ९ नंतर मध्य रात्रीपर्यंत खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

या शहरात पुरुषांपेक्षा महिला आघाडीवर
विजयवाडा, जमशेदपूर, बेळगाव, वडोदरा ही अशी शहरे आहेत येथे पुरुषांच्या तुलनेत महिला खरेदीदारांची संख्या अधिक आहे. सेक्स टॉय खरेदी करणाऱ्या अधिकतर ग्राहकांचे वय २५ ते ३४च्या दरम्यान आहे. पण या टॉयची खरेदी करणाऱ्या वेबसाइटवर अधिक तर वेळ भेट देणाऱ्यांचे वय १८ ते २५ वर्ष आहे. अनेक ग्राहक निरोध खरेदी करण्यासाठी वेबसाइटवर येतात आणि अखेर सेक्स टॉय खरेदी करतात, असे देखील दिसून आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, सेक्स टॉयमुळे ३३ टक्के विवाह मोडले नाहीत. पहिल्यांदा खरेदी करणारे अधिकतर पुरुष असतात. तर महिला पुरुषांच्या तुलनेत अधिक वेळा पुन्हा पुन्हा ऑर्डर करतात, असे यात म्हटले आहे.