Main Featured

IGM संदर्भात बदनामीकारक संभाषणाची ऑडिओ क्लिप प्रकरण : दोघे ताब्यात


First 6 months see 30% drop in crime in Gurugram | Gurgaon News ...

येथील शासकीय इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय संदर्भात बदनामीकारक संभाषणाची ऑडिओ क्लिप तयार करुन ती सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी गावभाग पोलिसांच्या पथकाने दोघांना गुरुवारी ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. अभिजित यशवंत कुलकर्णी व ऋषिकेश ओझा अशी त्या दोघांची नांवे असून कोरोनाबाधित युवकाचे नांवही निष्पन्न झाले आहे.


याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील तात्यासो मुसळे विद्यालयातील कोविड सेंटरमधील सुविधा तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय या अनुषंगाने दोघा तरुणांमधील संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मिडीयावर व्हायरल झाली. आयजीएम मध्ये दाखवण्यास गेल्यास सगळ्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह कराल्यात बघ यासह बदनामीकारक मजकूर असल्याने रुग्णालयाची बदनामी होत असल्याने या प्रकरणी रुग्णालयाचे कार्यालयीन अधिक्षक अविनाश चिले यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसात दोघा अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


पोलिसांकडून संशयिताचा शोध सुरु असताना गावभागचे सपोनि गजेंद्र लोहार व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीवरुन या प्रकरणी उपरोक्त दोघांची नांवे निष्पन्न झाली. पोलिसांनी अभिजित कुलकर्णी व ऋषिकेश ओझा यांना ताब्यात घेतले. मुसळे हायस्कूलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्‍या युवकाला कुलकर्णी यांने फोन केला होता. त्यांच्यातील संभाषणाची क्लिप त्याने शेजारीच राहणार्‍या ओझा याला टाकली होती. ती क्लिप ओझा याने नातेवाईकांना टाकली. तेथून ती क्लिप सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या दोघांनाही शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.