Main Featured

ब्रेकिंग - इचलकरंजीत पुन्हा झाला गोंधळ; अंत्यसंस्कार झाले अन् रिपोर्ट आला पॉझिटिव्हIchalkaranji Corona Infected

शहरात (Ichalkaranji Corona Infected) पुन्हा एकदा त्रिशुल चौक घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.  वर्धमान चौक परिसरातील एका वृद्धाचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. या वृध्दावर येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ उडाली असून मयत वृद्धाच्या नातेवाईकांसह अंत्यसंस्काराला गेलेल्या नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. यामुळे संबंधित रुग्णालयाचा बेफिकीरपणा समोर आला आहे.


Must Read


1)राज्यात नोकरीसाठी भूमिपुत्रांनाच संधी! सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय


2)धोनी इन्स्टावर फक्त तिघांनाच करतो फॉलो


3)शेअर बाजारात तेजी ; निर्देशांकांना खुणावतेय नवं शिखर


4)केंद्राकडून नऊ हजार कोटी मिळविण्याचे राज्याकडून प्रयत्न नाही, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप


5)खासगी डॉक्टरांनाही मिळणार ५० लाखांचे विमा संरक्षण, एकनाथ शिंदे यांची ग्वाहीकांही दिवसापूर्वी त्रिशुल चौक येथील वृद्धाचा येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्याच्यावर अंत्यविधी करीत असतानाच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे अंत्यविधीसाठी गेलेल्या सर्व नागरिकांना थेट विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या कनेक्शनमधून आतापर्यंत १५ जण बाधित झाले आहेत.

अशाच प्रकारच्या घटनेची शहरात पुनरावृत्ती झाली आहे. वर्धमान चौकातील एका ७३ वर्षीय वृध्दावरती कोल्हापू येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेहावर रविवारी सायंकाळी येथील पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र या वध्दाचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटीव्ह आला. त्यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाची तारांबळ (Ichalkaranji Corona Infected) उडाली. अंत्यसंस्कारला गेलेल्या नागरिकांसह घरातील नातेवाईकांना तातडीने विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. यांचा स्वॅब तपासासाठी पाठविण्यात येणार आहे. यामुळे वर्धमान चौक परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.