Main Featured

छोटा पांड्या आला; लॉकडाऊनमध्ये हार्दिक-नताशाने दिली GOOD NEWS
hardik pandya and natasa stankovic blessed with baby boy

टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्याच्या घरी आता छोटा पांड्या आला आहे. हार्दिक आणि नताशाने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. हार्दिक आणि नताशाला मुलगा झाला (hardik pandya and natasa stankovic blessed with baby boy)आहे. हार्दिकने सोशल मीडियावर ही गूड न्यूज दिली आहे.
हार्दिक आणि नताशाचा यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली आहे. दोघंही आता आई-बाबा झाले आहेत. हार्दिकने आपल्या चाहत्यांसह आपला आनंद शेअर केला आहे. आपल्या बाळाचा हात हाताच घेतल्याचा फोटो त्याने ट्विटरवर पोस्ट केला आहे.क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकने जानेवारीत साखरपुडा केला होता. हार्दिक पांड्या आणि नताशाने सोशल मीडियावर आपल्या साखरपुड्याची रोमँटिक छायाचित्रे शेअर केली होती आणि दोघांनीही एकमेकांना डेट केल्याची माहिती दिली. या दोघांच्या साखरपुड्याचा व्हिडीओ आणि फोटोंबाबत सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती. लॉकडाऊनमध्येही दोघं एकत्रच राहत होते. त्याचदरम्यान त्यांनी आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याचं सांगितलं आणि आता त्यांच्या घरी या चिमुकल्या पाहुण्याचं (hardik pandya and natasa stankovic blessed with baby boy) आगमन झालं आहे.