Main Featured

धक्कादायक! सुशांतचा ‘छिछोरे’ पाहताना 13 वर्षीय मुलीची आत्महत्याSushant singh rajput suicide

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant singh rajput suicide)याच्या निधनाला 1 महिन्याचा काळ उलटला तरीही अद्याप त्याच्या मृत्यूच्या शोकातून चाहते बाहेर येऊ शकले नाही. गेल्या महिन्याभरात अनेक आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याच छत्तीसगडमधून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे.
येथील एका 13 वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली आहे. या 13 वर्षीय मुलीने सुसाइड नोट लिहिली आहे.

Must Read


यामध्ये तिने लिहिले आहे की - सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर (Sushant singh rajput suicide) खूप दु:खी झाले आहे. म्हणून मी आत्महत्या करीत आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. भिलाई नगरचे श्रीनाथ त्रिपाठी यांनी याबाबत माहिती दिली.
छत्तीसगडच्या भिलाईमध्ये राहणारी 7 वीत शिकणारी विद्यार्थीनी जे. एंजेला हिने आत्महत्या केली आहे. सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर एंजेला खूप निराश झाली होती. आत्महत्या करण्यापूर्वी तिने सुशांतचा छिछोरे चित्रपटदेखील पाहिला. त्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. एंजेला तिच्या 3 भाऊ-बहिणींमध्ये सर्वात मोठी होती.  तिचे वडील एस. सतीश रायपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. सकाळीत त्यांनी पत्नी आणि दोन्ही मुलांना आजोबांकडे सोडले होते. आत्महत्येच्यावेळी एंजेला घरी एकटीच होती.

बुधवारी सायंकाळी जवळपास 5 वाजता टिव्हीवर छिछोरे चित्रपट सुरू होता. चित्रपट पाहताना ती आनंदात होती. त्यावेळी तिचे वडिलही घरी होते. यावेळी काही कारणास्तव त्यांना महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जावे लागले. काही वेळानंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा एंजेला दार उघडत नव्हती. तिचे वडील मागच्या दाराने आत गेले. त्यावेळी टिव्हीसमोरच सुशांतचा छिछोरे चित्रपट सुरू होता. त्यानंतर एंजेलाच्या वडिलांनी तातडीने तिला रुग्णालयात हलविले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.