फ्लिपकार्ट ग्रृपने (Flipkart) आज वॉलमार्ट इंडिया ताब्यात घेण्याची आणि फ्लिपकार्ट होलसेल या डिजिटल मार्केटप्लेसची घोषणा केली. ऑगस्ट महिन्यामध्ये फ्लिपकार्ट होलसेल (Flipkart Wholesale) लाँच करण्यात येणार आहे. फ्लिपकार्ट ग्रुपने वॉलमार्ट इंडिया प्राइवेट लिमिटेड (Walmart India Pvt Ltd) मध्ये 100 % भागधारीचे अधिग्रहण केले आहे आणि फ्लिपकार्ट होलसेल ती एक नवीन डिजिटल मार्केटप्लेस लाँच केली आहे. फ्लिपकार्ट होलसेल किराणा आणि फॅशनमध्ये त्यांची सेवा पुरवणार आहे.

Must Read

रिलायन्स समूहाने रिलायन्स जिओमार्ट लाँच केल्याच्या काही महिन्यानंतर लगेचच फ्लिपकार्ट होलसेल लाँच करण्यात आले आहे. उडान, मेट्रो कॅश, कॅरी आणि Amazonचे B2B डिव्हिजन हे फ्लिपकार्ट होलसेलचे सध्याचे देशातील स्पर्धत आहेत.
अमेरिकेतील रिटेल प्रमुख वालमार्टचे फ्लिपकार्टमध्ये बहुसंख्य भागभांडवल आहे. फ्लिपकार्टचे ज्येष्ठ अधिकारी आदर्श मेनन हे फ्लिपकार्ट होलसेलचे प्रमुख असतील. वालमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर अग्रवाल यांवा वॉलमार्टमध्ये नवीन भूमिका देण्यात येणार आहे. वॉलमार्ट इंडियाचे देशात दोन फुलफिलमेंट सेंटर्स व्यतिरिक्त 28 बेस्ट प्राइस स्टोअर्स आहेत. त्याचप्रमाणे 1.5 दशलक्ष सदस्यांना सेवा देत आहेत.
फ्लिपकार्ट होलसेलच्या (Flipkart Wholesale)लाँचमुळे किराणा आणि MSME क्षेत्रासाठी प्रतिभा, मजबूत तंत्रज्ञान, व्यापार कौशल्य व लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा घेता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. भारताच्या रिटेल इकोसिस्टममध्ये किरणा आणि एमएसएमई हे मध्यवर्ती आहेत आणि फ्लिपकार्ट होलसेल लहान व्यवसायांना महत्त्वपूर्ण मूल्य देऊन त्यांच्या गरजा भागविण्यावर भर देईल, अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे.