Main Featured

सुशांतच्या ‘दिल बेचारा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची वेळ जाहीरdil bechara release today

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)याचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. डिस्ने प्लस हॉटस्टारवर येत्या २४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याची वेळ आता जाहीर झाली आहे. २४ जुलै रोजी संध्याकाळी साडेसात वाजता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये सुशांतसोबत संजना सांघीची मुख्य भूमिका आहे.
Must Read


जॉन ग्रीन यांच्या ‘द फॉल्ट इन अव्हर स्टार्स’ या कादंबरीवर आधारित चित्रपटाची कथा आहे. यामध्ये सैफ अली खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. मुकेश छाबडाने या चित्रपटाचं (Dil Bechara Release Today) दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. सुशांतचा शेवटचा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशी चाहत्यांची इच्छा होती. मात्र लॉकडाउनमुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.किझी आणि मॅनी या दोघांची ही प्रेमकहाणी आहे. किझी कॅन्सरग्रस्त आहे आणि मॅनीचं तिच्यावर खूप प्रेम आहे. मात्र ही सामान्य प्रेमकहाणी नाही. यात बरेच ट्विस्ट आहेत. संजनाचा हा पहिलाच चित्रपट असला तरी ट्रेलरमध्ये तिच्या दमदार अभिनयाची छाप पाहायला मिळते. “जन्म आणि मरण आपल्या हातात नाही पण कसं जगायचं हे आपल्या हातात आहे”, हा सुशांतचा संवाद मनाला भिडतो.
१४ जून रोजी सुशांतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Sushant singh rajput suicide) केली. त्याच्या आत्महत्येची घटना प्रत्येकाच्याच मनाला चटका लावून गेली. सुशांतच्या शेवटच्या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये फार उत्सुकता आहे.