Main Featured

'या' क्रिकेटपटूची पत्नी आहे कराटे वर्ल्ड चॅम्पियन, दिसायला अनुष्कापेक्षा आहे सुंदर


क्रिकेटपटूंप्रमाणेच त्यांच्या पत्नीही चर्चेचा विषय असतात. अशाच एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची पत्नी केवळ तिच्या लूक्समुळे नाही तर तिच्या कामामुळे प्रसिद्ध आहे. क्रिकेटपटूंप्रमाणेच त्यांच्या पत्नीही चर्चेचा विषय असतात. अशाच एक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूची पत्नी केवळ तिच्या लूक्समुळे नाही तर तिच्या कामामुळे प्रसिद्ध आऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मिशेल जॉन्सनची पत्नी जेसिकाने लग्नाआधीच आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
2011 मध्ये जेसिका आणि जॉन्सन यांनी लग्न केले, आणि तेव्हापासून जॉन्सनसोबत जेसिका सावलीप्रमाणे आहे.लग्नाआधी जेसिका कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट होती. इतकेच नाही जेसिकाने नॅशनल स्तरावर 30 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कराटेमध्ये 14 विजेतेपद जिंकले आहेत.
केवळ कराटेच नाही तर जेसिकाने मॉडलिंगही केले आहे. ती एक बिझनेसव्हुमन आहे. जेसिकाने मास कम्यूनिकेशनमध्ये पदवी मिळवली आहे. पर्थमध्ये जेसिकाचे शिक्षण झाले.जेसिकाचे वडील पर्थमध्ये लहान मुलांना कराटे शिकवत असतं. तेथेच जेसिकाही कराटे शिकली.

9 वर्षांची असल्यापासून जेसिका कराटेचा सराव करत आहे.जेसिकाने 2006मध्ये कराटे वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. जेसिकाने तब्बल 15 वर्ष वडिलांच्या अॅकॅडमीमधून ट्रेनिंग घेतले. त्यानंतर 2011मध्ये जेसिका फॅशन अ‍ॅक्सेसरीज आणि हँडबॅगचे दुकान खोलले.जेसिकाचा ब्रॅण्ड सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. जेसिका कायम मैदानावर मिशेलला पाठिंबा देण्यासाठी हजर असायची, मात्र तिच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.