Main Featured

अरे वाह... ही तर दिलासा देणारी बातमी! मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी गेला 'इतक्या' दिवसांवर


मुंबईत Mumbai 22 जूलैपर्यंत 1 लाख 1 हजार रुग्णांची नोँद झाली असून 5 हजार 681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, 74 हजार 210 रुग्णांनी कोव्हिडवर मात केली आहे. जुलै महिन्यातील हॉटस्पॉट असलेल्य़ा उत्तर मुंबईतील संसर्गही आटोक्यात येत आहे. शहरातील एकाही विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 30 दिवसांच्या खाली नाही.
बोरीवलीत 32 दिवसांत दिवसात रुग्ण दुप्पट होत आहेत. हा शहरातील सर्वाात कमी कालावधी आहे. तर, एच पुर्व वांद्रे पुर्व प्रभागात 126 दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. हा शहरातील सर्वाधिक कालावधी असला तरी गेल्या आठवड्यापर्यंत या प्रभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 150 दिवसांपेक्षा जास्त होता. बोरीवली आणि कांदिवली येथे रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 40 दिवसांपेक्षा कमी आहे. कांदिवलीत 38 दिवस त्याखालोखाल डी प्रभाग ग्रॅन्टरोड मलबार हिल 43 दिवस, दहिसर 46 दिवस आणि गोरेगावमध्ये 47 दिवसांत रुग्ण दुप्पट होत आहेत. याशिवाय 4 विभागांत 80 दिवसांच्यावर, 5 विभागात 70 दिवस, 4 विभागात 60 दिवस, तर, 3 विभागांत रुग्णदुपटीचा कालावधी 50 दिवसांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. 
रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतील टप्पे (रुग्णवाढीचा दर)
- 22 मार्च  -       3 दिवस 
- 15 एप्रिल   -   5 दिवस 
-  12 मे      -   10 दिवस 
- 2 जून        -  20 दिवस ( 3.64%)
- 16 जून   -     30 दिवस (2.43%)
- 24 जून     -   41 दिवस (1.72%)
- 10  जुलै      -50 दिवस (1.39%)
22    जुलै      -61 दिवस( 1.14%)