Main Featured

सुशांतचा शेवटचा सिनेमा Dil Bechara च्या रिलीजनंतर काही तासातच Hotstar क्रॅश!
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची (Sushant Singh Rajput) चा शेवटचा सिनेमा शुक्रवारी 24 जुलै रोजी प्रदर्शित झाला. या सिनेमासाठी त्याचे चाहते कमालीचे उत्सुक होते. मात्र त्यांच्या लाडक्या 'मानव'चा हा शेवटचा सिनेमा आहे, यावर मात्र अद्याप कुणाचा विश्वास बसत नाही आहे. सुशांतचा हा सिनेमा 'दिल बेचारा' (Dil bechara released on Disney Plus Hotstar)ओटीटी प्लॅटफॉर्म डिझ्नी प्लस हॉटस्टार (Disney Plus Hotstar) वर शुक्रवारी संध्याकाळी प्रदर्शित झाला. यांनातर अवघ्या दोन तासातच हॉटस्टार क्रॅश झाले होते.
Must Read

याआधी गेले काही दिवस सुशांतच्या या चित्रपटाची खूप चर्चा होती. सोशल मीडियावर देखील यासंदर्भात बोलले जात होते. काही दिवस सुशांतसाठी ट्विटर हॅशटॅग देखील ट्रेंडिंग आहे. सुशांतला खूप दिवसांनी स्क्रीनवर पाहता येईल यामुळे चाहते उत्सुक होते. मात्र hotstar क्रॅश झाल्याने त्यांचा काहीसा हिरमोड झाला होता. त्यांनतर काही वेळातच पुन्हा hotstar सुरू झाले आहे.hotstar क्रॅश झाल्याचे ट्विट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील केले होते. सिनेमा पाहता पाहता मध्येच हॉटस्टार क्रॅश झाल्याचे ते (Dil bechara released on Disney Plus Hotstarम्हणाले. दरम्यान काही युजर्सनी देखील हॉटस्टारच्या अधिकृत ट्विटर आयडीला टॅग करत हॉटस्टारवर सिनेमा पाहताना मध्ये मध्ये समस्या येत असल्याची माहिती दिली.
मुकेश छाब्राचे दिग्दर्शन असलेल्या सिनेमात संजना सांघी हा नवोदित चेहरा दिसत आहे. या सिनेमात सुशांत म्हणजे मॅनीने घेतलेली एक्झिट मनाला चटका लावणारी आहे. अनेकांना आपल्या अश्रूंना आवर घालता आला नाही.