Main Featured

देवेंद्र फडणवीस हे राजकारणातले सचिन तेंडुलकरDevendra fadnavis

विरोधी पक्षांच्या दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांनी हजर राहू नये, असा जीआर काढल्यामुळे सत्ताधारी विरुद्ध भाजप असा वाद पेटला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसंच,  देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)हे राजकारणातले सचिन तेंडुलकर आहे, अशी स्तुतीसुमनं ही उधळली.

Must Readराज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांनी विरोधकांना भेटू न देण्याच्या निर्णयावरून सरकार विरुद्ध विरोधकांमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी 'हा निर्णय फडणवीस सरकारचा काळातला होता, असा दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
'हा मूळ निर्णय 2020 सालचा असून फडणवीस सरकारचा नाही. फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना विरोधकांवर भेटताच येणार नाही, असं कधीही म्हटलं नव्हतं. विरोधकांना अधिकाऱ्यांनी भेटू नये हा तुघलकी निर्णय आहे', अशी टीका दरेकरांनी केली.
हा निर्णय विरोधकांवर अन्याय करणारा आहे. कोरोना काळात सरकारच्या निष्क्रीयतेमुळे सरकारची नाचक्की झाली आहे. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. पण सरकारने कितीही मनाई करु देत आम्ही आमचे दौरे करणारच, असंही दरेकरांनी ठामपणे सांगितले.
त्याचबरोबर, 'प्रवीण दरेकर यांनी देवेंद्र फडणवीस  (Devendra fadnavis)यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. फडणवीस हे एक उत्तम अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. राज्याच्या राजकारणातले ते सचिन तेंडुलकर आहे', अशी स्तुतीसुमनं दरेकरांनी उधळली.
तो जीआर फडणवीस सरकारच्याच काळातला -थोरात
विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीला शासकीय अधिकारी उपस्थितीत राहू नये हा जीआर जुनाच आहे, आधीच्या सरकारच्या काळातील निर्णय आहे, असं महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केले आहे.