Main Featured

कधी आहे दहावीचा निकाल?
कोरोना (#corona)आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल (SSC Result 2020)लागायला काहीसा विलंब लागणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीच्या निकालाविषयी बोलताना या महिना अखेरीपर्यंत SSC चा निकाल लागेल, असं म्हटलं आहे.

Must Read

बारावीच्या परीक्षेचे निकालही दरवर्षीच्या तुलनेत उशीरा लागले. 16 जुलैला महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल (HSC result) जाहीर केला. बारावीप्रमाणेच दहावीचा निकालही ऑनलाईनच जाहीर होईल. SSC बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in या वेबसाईटवर निकाल जाहीर होतील.


SSC Result 2020
निकालाची नेमकी तारीख शिक्षणमंत्री गायकवाड यांनी स्पष्ट केली नसली तरी पुढच्या काही दिवसात दहावीच्या बोर्डाचा निकाल लागेल हे निश्चित.  mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाईटवर निकालासंदर्भात माहिती मिळेल.
या वर्षी मार्चमध्ये दहावीची परीक्षा घेण्यात आली. पण सर्व पेपर पुरे व्हायच्या आतच Coronavirusमुळे लॉकडाऊन सुरू झाला. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर त्यामुळे होऊ शकला नाही. त्यामुळे या वर्षी दहावीचा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. हावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.