Main Featured

शुभ बोल रे नाऱ्या… राज ठाकरेंच्या वक्तव्यावर टीकाcriticize MNS leader raj thackeray comment

“महाविकास आघाडीचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. ज्या सरकारमध्ये एकोपा नसतो एकमेकांना विचारलं जात नाही ते जास्त काळ टिकणार नाही,” असं मत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त (criticize MNS leader raj thackeray comment)केलं. 
Must Readयावर बोलताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “शुभ बोल रे नाऱ्या… राज्य सरकार चांगलं काम करत आहे. कामाचं कौतुकही केलं पाहिजे,” असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’या एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
“शुभ बोल रे नाऱ्या एवढंच मी म्हणेन. सरकार चांगलं काम करत आहे. त्यावर चांगलं बोललं पाहिजे. सरकार चांगलं काम करतंय. सरकार जनतेच्या पाठीशीही उभं आहे. आमच्या चुका नक्कीच दाखवल्या पाहिजे. त्यातील कमतरता आम्ही भरून काढू. पण सरकारच्या चांगल्या कामांचं कौतुकही व्हायला हवं,” असं देसाई (criticize MNS leader raj thackeray comment) म्हणाले.
राज्यातील गोष्टी पूर्वपदावर
“राज्यातील गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्यभरातील ४० हजार हेक्टर जमीन एमआयडीसीला देण्यास तयार आहोत. करोनामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यासाठी मंत्रिमंडळानं पॅकेज तयार केलं आहे. त्यासाठी मंत्रिमंडळाची मान्यता येणं बाकी आहे. वीजबिल, व्याजात सवलत, काम नसताना वेतन दिलं त्यावर अनुदान देणं अशा मागण्या आमच्या समोर आल्या आहे. आमच्या चर्चा झाल्या आहेत. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर सांगणार यावर अधिक माहिती देऊ. राज्यात २० हजार कोटींचे उद्योगधंदे येणार आणि हे केवळ कागदावर नाही. रायगडमध्ये एमआयडीसी नवी सुरू करणार आहोत,” असंही ते म्हणाले.