Main Featured

आणखी एक दिलासा देणारी बातमी! देशात 10 लाखहून अधिक रुग्णांचा कोरोनाविरुद्ध लढा यशस्वी


आणखी एक दिलासा देणारी बातमी! देशात 10 लाखहून अधिक रुग्णांचा कोरोनाविरुद्ध लढा यशस्वीदेशात कोरोनाच्या (corona virus) संसर्गाचा वेग वाढला असला तरी मृत्यूदराची टक्केवारी कमी झाली आहे तर कोरोनाविरुद्ध लढा देऊन रिकव्हर होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्यानं मोठा दिलासा आहे. जून आणि जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली होती. जुलै अखेरीस कोरोना रुग्णांच्या रिकव्हरीचा आकडा दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे.
भारतात कोरोनामुळे (corona virus) मृत्यू झालेल्यांचा आतापर्यंत आकडा 35 हजारवर पोहोचला आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या म्हणजेच रिकव्हर होणाऱ्यांची संख्या तब्बल 10 लाख आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत देशात कोरोनाचा आकडा 15 लाख 84 हजार 384वर पोहोचला आहे.
24 तासांत देशात 50 हजार लोकांना कोरोनाचा (corona) संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत देशात 10 लाख 21 हजार 611 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाच्या आकडेवारीत जगभरात अमेरिका पहिल्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे. कोरोनाचा संसर्ग जरी जास्त लोकांना होत असला तरी भारतात मृत्यूदराची टक्केवारी सर्वात कमी आहे आणि रिकव्हरी रेट सर्वात जास्त असल्यानं काहीसा दिलासाही आहे.