Main Featured

लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प म्हणून तरुण झाला किडनॅपर, असं केलं प्लॅनिंग


धक्कादायक प्रकार! लॉकडाऊनमध्ये व्यवसाय ठप्प म्हणून तरुण झाला किडनॅपर, असं केलं प्लॅनिंगकोरोनामुळे देशात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले, परिणामी लोकांवर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आली. मात्र लॉकडाऊनमुळे देहरादूनमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. लॉकडाऊनमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी एका तरुणानं चक्क किडनॅपर होण्याचा मार्ग निवडला. राजीव दुआ असे या तरुणाचे नाव असून, त्याला देहरादून पोलिसांनी अटक केली आहे.
असे सांगितले जात आहे की, 10 जुलै रोजी एका प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाचे 4 लोकांनी ओडिशामध्ये अपहरण केले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजीव दुआ याला देहरादूनच्या रायपूर भागातून देहरादून पोलिसांनी अटक केली आहे.
ओडिशामध्ये केले होते अपहरण
उत्तराखंडमधील गुन्हेगारीचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढले आहेत. यापूर्वी अशा बर्‍याच घटना घडल्या आहेत. काही केवळ गुन्हेगारांनी उत्तराखंडमध्ये आश्रय घेतला होता, परंतु ओडिशाचा अपहरणकर्ता पोलिसांच्या नजरेतून सुटू शकला नाही. आरोपींकडून घटनेत वापरलेली स्विफ्ट कार व मोबाईल जप्त केले आहेत.
लॉकडाऊनमुळे झाला किडनॅपर
देहरादूनचे डीआयजी अरुण मोहन जोशी यांनी सांगितले की, व्यवसायिक नुकसानीमुळे या व्यक्तीने मित्रांच्या मदतीने अपहरणाची योजना आखली आणि 10 जुलै रोजी ही घटना घडली. मात्र, अपहरण झालेल्या व्यावसायिकाच्या जागेचा शोध पोलीस घेत असल्याचे त्यांना समजले. पोलिसांच्या हाती लागू या भीतीने हे लोकं घाबरले, आणि व्यावसायिकाला सोडून पळून गेले. मुख्य आरोपी राजीव दुआ हा 18 तारखेला ओडिशाहून देहरादून येथे कार घेऊन आला आणि तेव्हापासून तो इथेच होता. या दरम्यानच ओडिशा पोलिसांनी राजीवबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी असा रचला सापळा
आरोपी आरोपी मूळ देहरादूनचा असल्याने ओडिशा पोलिसांनी या प्रकरणाची माहिती देहरादून पोलिसांना फोनद्वारे दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन डोईवाला आणि एसओजी यांच्या कार्यक्षेत्रात एक पथक तयार करण्यात आले आणि राजीव दुआला अटक करण्यासाठी त्वरित कारवाई करण्यात आली. आरोपी राजीव दुआ याला रायपूरच्या डोभाल चौक परिसरातून अटक करण्यात आली.