Main Featured

कोरोनापासून वाचवण्यासाठी मुलांना पाजली गावठी दारू, धक्कादायक VIDEO VIRAL


कोरोनापासून वाचवण्यासाठी मुलांना पाजली गावठी दारू, धक्कादायक VIDEO VIRALदेशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दुसरीकडे कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत ओडिशामधील एक गावात चक्क लहान मुलांना कोरोनापासून वाचवण्यासाठी दारू पाजण्यात आली. या सगळ्या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ समोल आला आहे.
मुख्य म्हणजे ही गावठी दारू सालापाच्या झाडाच्या तयार केलेली आहे. येथील आदिवासी भागातील लोकं नशेसाठी या दारूचा वापर करतात, मात्र गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यात काही औषधी गुणही आहेत. ओडिशामधील मलकांगिरी जिल्ह्यातील पारसनपाली या गावात एका लग्न कार्यक्रमात 10-12 वर्षांच्या मुलांना ही गावठी दारू पाझण्यात आली.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, मलकांगिरी जिल्ह्यातील लोकं सलापाच्या झाडापासून तयार केलेली दारू रोज पितात. मात्र ही दारू लहान मुलांना दिली जात नव्हती. दरम्यान, कोरोनाच्या संकटात आपल्या मुलांना या व्हायरसपासून वाचवण्यासाठी आता दारूही दिली जात आहे.
ओडिशा न्यूजने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुलांना एका पंगतीत खाली बसून ग्लासात दारू दिली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक प्रशासन लोकांना कोरोनाबाबत माहिती देत नसल्याचे समोर आले आहे.
ओडिशामधील घटनेमुळे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नारायण दास यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन त्यांना याबाबत माहिती दिली आहे. तसेच मुलांना दारू न देण्याचा आवाहनही केले आहे.