Main Featured

Breaking - इचलकरंजी पुन्हा Lock
इचलकरंजी (ichalkaranji) नगरपरिषद क्षेत्र, शहापूर, कबनुर, चंदुर, तारदाळ, खोतवाडी या क्षेत्रामध्ये दिनांक ०४/०७/२०२० ते १३/०७/२०२० रोजी

रात्री १२.०० वा. पर्यंत खालील प्रमाणे काही बाबी प्रतिबंधीत करण्याचा आदेश दिला आहे.

१) पाच पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणेस प्रतिबंध करणेत येत आहे.

२) नगरपरिषद हद्दीतील प्रत्येक प्रभागातील नागरिकांच्या अनावश्यक हालचाली प्रतिबंधीत करण्यात येत आहेत. नागरिकांना अत्यावश्यक कारणे किंवा उद्योग व्यवसायाचे कारणाव्यतिरिक्त एका प्रभागातुन दुसऱ्या प्रभागात जाणेस प्रतिबंध करण्यात येत आहे. सदरचा प्रतिबंध नगरपरिषद हद्दीनजीकच्या या आदेशात नमुद गावांचे सीमांनाही लागु राहील. अशा गावातील नागरिकांच्या अनावश्यक हालचाली प्रतिबंधीत करण्यात येत आहेत. या गावांतील नागरिकांनी अत्यावश्यक कारणे किंवा उद्योग-व्यवसायाचे कारणाव्यतिरिक्त एका गावातून दुसऱ्या गावामध्ये किंवा इचलकरंजी नगरपरिषद हद्दी मध्ये जाण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.

३) मोर्चे, सभा, आंदोलने प्रतिबंधीत करण्यात येत आहेत. पाच पेक्षा जास्त व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून निवेदन देणेस प्रतिबंध करणेत येत आहे.

४) लग्न, मुंज, साखरपुडा, वाढदिवस इ. सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम, समारंभ, धार्मिक कार्यक्रम किंवा इतर कोणतेही कार्यक्रमास प्रतिबंध करणेत येत आहे.

५) केशकर्तनालये, स्पा, सलूनस्, ब्युटी पार्लर्स इ. आस्थापना सुरु ठेवणेस प्रतिबंध करणेत येत आहे.
६) ऑटो रिक्शा, काळी पिवळी, टेंपो ट्रॅव्हलर इ, प्रवासी वाहतूक करणेस प्रतिबंध करणेत येत आहे.

७) रस्त्यावरील हातगाडीवर खादयपदार्थ किंवा इतर सर्व प्रकारची उघडयावरील व रस्त्यावर विक्री प्रतिबंधीत करणेत येत आहे. (यामध्ये भाजीपाला व जिवनावश्यक वस्तु यांना सुट असेल परंतु यावर स्थानिक स्वराज्य संस्थेचे निबंध लागू राहतील.)

८) सदर प्रतिबंधीत आदेश लागु असणाऱ्या क्षेत्रातील सर्व नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे व दुकाने किंवा इतर ठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधन कारक करण्यात येत आहे.

९) सदर प्रतिबंधीत क्षेत्रातील सर्व व्यापारी, औद्योगिक व इतर आस्थापनांनी त्यांचे नियमित कर्मचारी संख्येच्या ५०% पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आस्थापनेत / कामावर उपस्थित ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आस्थपनेत निर्जतुकीकरण,मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे इ. संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक बाबी करण्यांचे बंधन संबधीत आस्थापनेवर घालण्यात येत आहे.

१०) सर्व शाळा, कॉलेज, शेक्षणिक/ प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना शेक्षणीक कामकाज करणेस प्रतिबंध करणेत येत आहे.

(शिक्षणेत्तर कामकाज उदा, ई-सामुग्री विकास, उत्तरपत्रिकांचके मुल्यांकन आणि निकाल जाहीर करणे इ.वगळून),

११) सर्व आतिथ्य सेवा सुविधा (गृहनिर्माण सेवा / पोलीस/ सरकारी अधिकारी/ आरोग्यसेवा कर्मचारी / पर्यटकांसह अडकलेल्या व्यक्ती यांच्या साठी आणि अलगीकरणासाठी वापरल्या गेलेल्या वगळून.) प्रतिबंधीत असेल. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री, चित्रपटगृहे, शॉपिंग मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, प्रेक्षागृहे आणि सभागृहे. असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधीत असतील. (अत्यावश्यक सेवा व जिवनावश्यक वस्तू व वैद्यकीय सेवा देणाऱ्या
आस्थापना वगळून.)

१२) सर्व सामाजिक / राजकिय / क्रिडा/करमणूक/ शैक्षणीक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे घेणेस प्रतिबंध करणेत येत आहे.

१३) सर्व धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (ichalkaranji) ही नागरिकांकरिता बंद ठेवली जातील तसेच असे धार्मिक कार्यक्रम घेणेस प्रतिबंध करणेत येत आहे.