Main Featured

रियाकडून सुशांतचा छळ, त्याला ब्रेकअप करायचा होता; अंकिताचा धक्कादायक खुलासा


रियाकडून सुशांतचा छळ, त्याला ब्रेकअप करायचा होता; अंकिताचा धक्कादायक खुलासा बॉलिवूड अभिनेता sushant singh rajput  सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे. सुशांतच्या कुटुंबाकडून पाटण्यामध्ये त्याची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या नावे गुन्हा नोंदवण्यात आला. ज्यानंतर हालचालींना वेग आला आणि बिहार पोलिसांनी थेट मुंबई गाठली. या साऱ्या प्रकरणामध्ये अभिनेत्री आणि सुशांतची पूर्वाश्रमीची प्रेयसी अर्थात त्याची एक्स गर्लफ्रेंड ankita lokhande अंकिता लोखंडे हिचंही नाव पुढं येत आहे. 
बिहार पोलिसांनी अंकिताची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. ज्यामध्ये तिनं काही धक्कादायक खुलासे केल्याचंही बोललं जात आहे. बुधवारी अंकिताची बिहार पोलिसांनी चौकशी केली असतना तिनं सुशांतशी आपलं २०१९ मध्ये बोलणं झाल्याची माहिती दिली. अंकिताचा 'मणिकर्णिका' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्याच काळात त्यांचं बोलणं झालं होतं. ज्यावेळी सुशांतनं rhea chakraborty रिया चक्रवर्तीसोबतच्या त्याच्या नात्याविषयी अंकिताला काही गोष्टी सांगितल्या होत्या. 
आपल्या पदार्पणाच्याच चित्रपटासाठी शुभेच्छा देण्यासाठी म्हणून सुशांतनं आपल्याला मेसेज केल्याचं अंकितानं पोलिसांना सांगितलं. त्यावेळी तो बराच भावनिक झाला होता, असंही ती म्हणाली. आपण या नात्यात आनंदी नसल्याचं म्हणत रिया आपला छळ करत असल्यामुळं या नात्यातून बाहेर पडण्याबाबत तो बोलला होता असंही अंकितानं सांगितलं. 
सुशांतसोबत झालेल्या बोलल्याचा चॅटही तिनं पोलिसांकडं सुपूर्द केला. अंकितानं केलेला हा धक्कादायक खुलासा पाहता सुशांतची प्रेयसी रिया चक्रवर्ती हिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, रियाविरोधात तक्रार दाखल झाल्याची माहिती माध्यमांकडून प्रसिद्ध होताच इथं अंकितानं एक सूचक सोशल मीडिया पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. सत्यातात विजय होतो.... अशा आशयाची पोस्ट तिनं केली. तिचे हे शब्द खूप काही बोलून गेले असं म्हणायला हरकत नाही. तेव्हा आता तिनं दिलेल्या या माहितीनंतर नेमकं या प्रकरणाला कोणतं वळण मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.