Main Featured

कुंभ राशी भविष्य


आपल्या अनुमान न लावता येणा-या स्वभावाचा परिणाम आपल्या वैवाहिक आयुष्याला हानीकारक ठरणार नाही याची दक्षता घ्या. शक्यतो हे टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा नंतर तुम्हाला पश्चाताप करावा लागू शकतो. आज तुम्हाला अनेक नवीन आर्थिक योजना सादर केल्या जातील - कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या-वाईट बाबी तपासून पाहा. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा - मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. आयटी क्षेत्रातील व्यक्तींना त्यांचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल. पण यश प्राप्त करण्यासाठी तुम्हाला आपल्या विषयावर लक्ष केंद्रीत करून, सातत्याने काम करत राहण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो की, मैत्रीमुळे आपल्या महत्वाच्या वेळेला खराब करू नका. मित्र हे येणाऱ्या काळात ही भेटू शकतात परंतु, शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. घरीकाम करणारा चाकर/मोलकरीण येणार नाही, त्यामुळे तुमच्या जोडीदारावर ताण येईल.
उपाय :- एका पांढऱ्या कपड्यात काळे आणि पांढरे तीळ सारख्या प्रमाणात गुंढाळून घ्या आणि उत्तम स्वास्थासाठी एका बंडलला नेहमी आपल्या सोबत ठेवा.