Main Featured

विनाकारण फिरणार्‍या २८ गाड्यांवर कारवाई


दिनांक 20 जुलै ते 26 जुलै पर्यंत कोल्हापूर जिल्हा Kolhapur District Lockdown ची घोषणा केल्यानंतर जिल्ह्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु या काळामध्ये हातकणंगले तालुक्यातील रुई येथील सहारा नगर परिसरामध्ये Lockdown असताना या काळात विनाकारण गाडी घेऊन रस्त्यावर फिरणे व अनावश्यक विना मास्क रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून आज दिनांक 22 जुलै रोजी कारवाई करण्यात आले आहे. यामध्ये रुई येथील सहारा नगर परिसरातील तब्बल 28 गाड्यांवर कारवाई करून या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलिस नाईक शंकर पाटील यांनी केले आहे.