Main Featured

इचलकरंजीतील कोरोनाची श्रृंखला अखंडीतच


The Corona Crisis: The Rothschilds? Bill Gates? The Search For A ...मागील दोन आठवड्यापासून दररोज वाढता असलेला कोरोनाबाधितांचा आलेख सकाळच्या  सत्रात शहरवासियांना दिलासा देणारा ठरला असताना सायंकाळी प्राप्त अहवालात मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढली. रविवारी सायंकाळपर्यंत प्राप्त अहवालात 31 बाधित रुग्ण मिळून आले. त्यामुळे आजअखेर कोरोनाबाधितांची संख्या 734 वर पोहोचली असून 100 पेक्षा अधिकजणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे 570 जण उपचार घेऊन असून उपचारादरम्यान मृतांची संख्या 36 झाली आहे.
Muat read

1) 31 जुलैनंतर काय होणार?


2) माझं वय 85 नाही, पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर


3) इंडस्ट्रीमधील विरोधी गटांमुळे मला काम मिळत नाही - ए. आर. रेहमान


4) सुशांतसोबत काम करण्यासाठी कंगनाने दिला होता नकार


5) धक्कादायक : ३,३०० करोना रुग्णांचा पत्ताच लागेना


महिन्याचा कालावधी लोटला तरी इचलकरंजीतील कोरोनाची श्रृंखला अखंडीत राहिली आहे. प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. परंतु समुह संसर्गातून कोरोनाची लागण वाढतच चालल्याचे दिसत आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणातील वाढता प्रादुर्भाव पाहता इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात रॅपिड अँटीजेन टेस्ट लॅब सुरु करण्यात आली आहे. त्याचा अहवालही झटपट मिळत आहे. परंतु वाढत्या संख्येमुळे रुग्णांवर उपचारासाठी जागेची उपलब्धता होत नाही. आज दिवसभरात शहरातील सरस्वती मार्केट, भोनेमाळ, शगुन रेसिडेन्सी, प्रियदर्शिनी कॉलनी, शहापूर, हत्ती चौक आदी परिसरात रुग्ण आढळून आले आहेत.