Main Featured

Birthday Special : कियारा आडवाणीHappy birthday kiara advani

आज ३१ जुलै रोजी कियाराचा वाढदिवस (Happy birthday kiara advani)आहे. कियाराने गेल्या वर्षी तिचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. पण यंदा करोनामुळे (#coronavirus) उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्या मित्र-मैत्रीणींसोबत कियारा वाढदिवस साजरा करणार असल्याचे म्हटले जाते.

बॉलिवूड सेलिब्रीटी नेहमी महागड्या वस्तू वापरताना दिसतात. खासकरुन अभिनेत्री लग्जरी ब्रॅन्डच्या शौकीन असतात आणि बऱ्याच वेळा महागड्या कपड्यांसह अनेक महागड्या अॅक्सेसरीज वापरताना दिसतात. या अॅक्सेसरीजमध्ये हॅण्डबॅग पहिल्या क्रमांकावर आहेत.
Must Readबॉलिवूडची बेबो करिना कपूर (Karina Kapoor), सोनम कपूर, आलिया भट्ट, दीपिका पदूकोण, अनुष्का शर्मा अनेक वेळा महागड्या बॅग वापरताना दिसतात. या यादीमध्ये कियारा आडवाणीचादेखील समावेश झाला आहे.  


गेल्या वर्षी कियाराने वाढदिवस (Happy birthday kiara advani)  साजरा करताना पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिने सॅटिन फायब्रिकचा फिश कट प्लेन स्कर्ट आणि त्यावर क्रॉप टॉप परिधान केला होता. या लूकमध्ये ती अत्यंत ग्लॅमरस अंदाजात दिसत होती. चाहत्यांना तिचा हा लूक फार आवडला होता. त्यावर तिने छोटी बॅग घेतली होती. पण ही छोटी बॅग सर्वांचे आकर्षण ठरली होती.
या छोट्या बॅगची किंमत जाणून तुम्ही देखील थक्क व्हाल. ही बॅग आकाराने लहान असली तरी तिची किंमत लाखो रुपये आहे. ही बॅग कियाराने लग्जरी ब्रॅन्ड ‘Chanel’ची घेतली आहे. तिची किंमत जवळपास ५ हजार डॉलर म्हणजे ३ लाख ५० हजार रुपये आहे. त्यामुळे कियारा देखील लग्झरी ब्रँडची शौकीन असल्याचे दिसत आहे.
कियाराने २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फगली’ या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही. त्यानंतर तिने २०१६ मध्ये ‘एम. एस. धोनी’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली. ‘भारत अने नेनू’, ‘कलंक’, ‘कबीर सिंग’, ‘गुड न्यूज’ या चित्रपटांमध्ये भूमिका मिळाल्या. तसेच तिने ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजमध्ये देखील भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमधील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले.