Main Featured

या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर!




कोरोनाचे (#CORONAVIRUS)वाढते संक्रमण आणि लॉकडाऊनमध्ये आर्थिक समस्या कमी करण्यासाठी येस बँकेने (Yes Bank) त्यांच्या ग्राहकांसाठी खास सुविधा आणली आहे. बँकेने इन्संट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या WhatsApp वर ग्राहकांसाठी बँकिंग सेवा सुरू केल्या आहेत.
ग्राहकांच्या मदतीसाठी ही सेवा 24 तास सुरू राहणार (yes bank launches whatsapp banking services)आहे. बँकेचा असा दावा आहे की, 60 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आणि सेवा WhatApp वर उपलब्ध असतील आणि ज्यामुळे ग्राहकांना काँटॅक्टलेस सेवा मिळेल. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी बँकेने हा निर्णय घेतला आहे. ग्राहकांसाठी बँकिंग व्यवहार सोपे करणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Must Read

कोणत्या सेवा WhatApp वर मिळणार? (yes bank launches whatsapp banking services)
-या सविधेअंतर्गत येस बँकेचे ग्राहक एक मेसेज करून त्यांच्या खात्यातील बॅलन्स तपासू शकतात.


-काही कालावधीमध्ये केलेले व्यवहार, डिजिटल बँकिंग प्रोडक्ट्स देखील ग्राहक पाहू शकतील
-त्याचप्रमाणे एफडीवर लोन घेऊ शकतील आणि चेक बुक देखील ऑर्डर करता येईल. ग्राहकांना या माध्यमातून अवैध व्यवहाराबाबत तक्रार देखील नोंदवता येईल.


60 पेक्षा अधिक प्रोडक्ट्स आणि सेवांसाठी या माध्यमातून अर्ज देखील करता येईल
-या माध्यमातून पीएम केअर फंडमध्ये पैसे देखील जमा करता येतील
-तुम्हाला जर जवळपासच्या एटीएम ऑफिसचा किंवा बँक शाखेचा पत्ता हवा असेल, तर ते देखील या सेवेतून मिळवणे शक्य आहे
कशी सुरू कराल ही सेवा?
येस बँकेच्या ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सेवा सुरू करुन घेण्यासाठी 91-829-120-1200 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल. यानंतर तुम्हाला ही सेव्हा सुरु करण्यासाठी एका लिंकसह एसएमएस येईल. 91-829-120-1200 हा नंबर तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप सुरू करून या नंबरवर 'Hi' असा मेसेज करा.
या व्यवहाराच्या सुरक्षेबाबातही बँक विशेष सक्रिय आहे. यामध्ये केले जाणारे मेसेज एंड टु एंड एनक्रिप्शनने सुरक्षित असतील असा दावा बँकेने केला आहे. त्याचप्रमाणे या यामध्ये नावापुढील ग्रीन बॅजमुळे हे सुनिश्चित होत आहे की, बँकेच्या व्हेरिफाइड अकाउंटबरोबर ग्राहकाची बातचीत सुरू आहे. बँकेचे असे म्हणणे आहे की, AIवर आधारित पर्सनल असिस्टंट रोबो च्या मदतीने WhatsApp Banking द्वारे ग्राहकांचे काम काही सेकंदात होईल.
या बँका देत आहेत WhatsApp Banking ची सेवा
लॉकडाऊन काळात डिजिटल बँकिंगच्या सुविधांचा वापर वाढला आहे. यामुळेच अनेक बँकांनी व्हॉट्सअ‍ॅपशी हात मिळवला आहे. या मेसेजिंग अ‍ॅपद्वारे अनेक सेवा ग्राहकांना उपलब्ध होतात. फेसबुकची मालकी असणाऱ्या या कंपनीने काही मोठ्या बँकांबरोबर त्यांची पार्टनरशीप वाढवली आहे. या बँकांमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआई बँक, कोटक महिंद्रा बँक, अ‍ॅक्सिस बँक आणि आरबीएल बँकेचा समावेश आहे.