Main Featured

अरेच्चा! पिवळ्या बेडकांनंतर आता दिसलं पिवळं कासव Video Viral
काही दिवसांपूर्वीच पिवळ्या बेडकांनी (yellow frog) सोशल मीडियावर (social media) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आणि या पिवळ्या बेडकांनंतर आता पिवळ्या रंगाचं कासवही (yellow turtle) दिसून आलं आहे. ओडिशाच्या एका गावात पिवळं कासव सापडलं आहे. हे कासव दुर्मिळ असल्याचं सांगितलं जातं आहे.
Must Read

ओडिशाच्या (odisha) बालासोर जिल्ह्यातील  सुजाणपूर गावातल्या स्थानिकांना पिवळ्या रंगाचं कासव दिसलं. ओडिशाची राजधानी भुवनेश्वरपासून 196 किलोमीटर दूर हे गाव आहे. स्थानिकांनी या कासवाबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि या कासवाला वनविभागाच्या स्वाधीन केलं आहे. एएनआयशी बोलताना वन्यजीव तज्ज्ञ बी. आचार्य म्हणाले "हे कासव खूप दुर्मिळ (yellow turtle video viral on social media)आहे. मी आतापर्यंत या ठिकाणी असं कासव पाहिलं नाही"


इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुसंता नंदा यांनीदेखील अशा पिवळ्या कासवाचा व्हिडीओ शेअर केला आहे. काही वर्षांपूर्वी सिंधमध्येदेखील असं कासव आढळून आल्याचं त्यांनी सांगितलं.


हे कासव अल्बिनो (एक प्रकारची त्वचेची समस्या) कासव (yellow turtle video viral on social media)आहे. त्याचे गुलाबी डोळे अल्बिनिझम असल्याचं दर्शवत आहेत. त्यामुळेच त्याचा रंग पिवळा झालेला असावा असं सुसंता नंदा म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच पिवळ्या बेडकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. इंडियन फॉरेस्ट अधिकारी परवीन कसवान यांनी या पिवळ्या बेडकांचा व्हिडीओ शेअर केला आहे. मध्य प्रदेशच्या नरसिंहपूरमध्ये एक दोन नव्हे तर भरपूर प्रमाणात पिवळे बेडुक दिसले.