Main Featured

BREAKING :शरद पवारांकडे मोठी जबाबदारी
संसदेच्या स्टॅंडींग कमिटीवर राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात शरद पवार (NCP Precedent Sharad Pawar)यांना संरक्षण खात्याशी संबंधित समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं (appointment of new rajya sabha mps to parliamentary)आहे. उदयनराजे यांच्याकडे रेल्वे तर रंजन गोगोई यांना परराष्ट्र विषयक कमिटीवर नियुक्त करण्यात आले आहे. खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांना मनुष्यबळ विकास संसदीय समितीवर चेअरमन म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.


Must Read


कोरोना (#coronavirus)कालावधीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची समस्या निर्माण झाली आहे तर चीन आणि पाकिस्तानसोबत संघर्ष होत असल्यामुळे संरक्षण समितीकडे देशाचं लक्ष असणार आहे. या दोन्ही समित्यांवर मराठी खासदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. यंदा कोरोना आणि भारत-चीन हे प्रमुख मुद्दे आहेत. सध्या देशात भारत-चीन विवाद सुरू आहे. अशात शरद पवार यांच्याकडे संरक्षण कमिटी देण्यात आली आहे.
कोणाकडे कोणती कमिटी : (appointment of new rajya sabha mps to parliamentary)
- विनय सहस्त्रबुद्धे : एचआरडी, चेअरमन.
- शरद पवार (NCP Precedent Sharad Pawar) : डिफेन्स कमिटी
- उदयनराजे : रेल्वे कमिटी
- प्रियांका चतुर्वेदी : काॅमर्स कमिटी
- डाॅ. भगवान कराड : पेट्रोलियम कमिटी
- ज्योतिरादित्य सिंधिया : एचआरडी कमिटी
- रंजन गोगोई : परराष्ट्र विषयक कमिटी
- राजीव सातव : डिफेन्स कमिटी