Main Featured

महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह?
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची बातमी काही वेळापूर्वी वेगाने पसरली होती. मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे समोर आले आहे.सध्या अमिताभ बच्चन नानावटी रुग्णालयामध्ये आहेत.  अमिताभ यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. प्रसार माध्यमांवर असे सांगण्यात येत होते की त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे, दरम्याने हे वृत्त खोटे असल्याचे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.


Must Read


अद्याप अभिषेक बच्चन,  ऐश्वर्या राय आणि आराध्या संबधितही कोणतीही माहिती समोर आली नाही आहे. याआधी अशी माहिती समोर आली होती की अमिताभ यांना आज डिस्चार्ज मिळणार अशी माहिती देखील समोर आली होती. मात्र त्याबाबतही अद्याप ठोस अशी माहिती मिळाली नाही आहे.


दरम्यान अमिताभ बच्चन यांनी गेल्या काही दिवसात वेळोवेळी त्यांच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. ट्वीटरच्या माध्यमातून त्यांनी चाहत्यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या प्रार्थनांमुळे त्यांनी त्यांचे आभार मानले आहेत. आज देखील त्यांनी यासंदर्भातील एक ट्वीट केले होते.


अमिताभ यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर देशभरातून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. ते लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. त्यांच्यावर चाहत्यांचा प्रेमाचा, कौतुकाचा वर्षाव होतोच आहे.  रुग्णालयातही ते सोशल मीडियावर सक्रिय आहेत. आपल्या आरोग्याबाबतची माहिती देत आहेत आणि विशेष म्हणजे आपल्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचेही सातत्याने आभार मानत आहेत.