पुणेसह पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा कहर (Corona cases in pune)कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात पुन्हा लॉकडाऊन वाढवण्यात (Lockdown In Pune)आला आहे.
पुण्यात गुरूवारी रात्री 12 वाजता 10 दिवसांचा लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, शुक्रवारपासून 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये आधीचेच नियम आहे तसेच राहतील, असं जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं आहे. तर पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.

Must Read


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 13 जुलैच्या मध्यरात्रीपासून 23 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत पुण्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात पाच दिवस अत्यंत कडक लॉकडाऊन होता, मात्र दुसऱ्या टप्प्यात 19 तारखेपासून शिथिलता देण्यात आली होती. तरी देखील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत झपाट्यानं वाढ (Corona cases in pune)झाली. 
Lockdown In Pune
परिणामी आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी आणि रविवारी नागरिक खरेदीसाठी मोठी गर्दी करतात, हे दिसून आला. त्यामुळे बाजारपेठ आणि लग्न समारंभाबाबत प्रतिबंध लावण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी सहा या वेळेत खरेदीसाठी वेळ वाढवून देण्यात आली होती. परंतु इतक्या दिवसांनी आलेली शिथिलता आणि त्यात गटारी अमावस्येमुळे पुणेकरांनी मोठी झुंबड केली होती. त्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता.
दरम्यान, पुण्यात लॉकडाऊनच्या काळात गेल्या 9 दिवसांत तब्बल 14109 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर, या दरम्यान पुण्यात 230 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहर आणि ग्रामीणमध्ये सध्या कोरोनाचे 63351 कोरोना रुग्ण आहेत. तर 22 484 रुग्णांना रुग्णालयातून डिचार्ज मिळाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे 1514 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.