Main Featured

गुरुवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून 135 वाहनधारकांवर कारवाईलॉकडाउनच्या आज चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून 135 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत एकूण 365 वाहनांवर कारवाई झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनचा चौथा दिवस होता. रुग्ण वाढीची संख्या कमी करण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. मात्र अजूनही काही बेफिकीरपणाने फिरणारे व विनाकारण कुठलीही खबरदारी न घेता फिरणारे मिळून येत आहेत. अशाच विनाकारण फिरणार्‍या नागरिकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. आज 135 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली तर 27 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान काल तिसर्‍या दिवशी 120 कारवाई करण्यात आली होती.