Main Featured

दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने पंतप्रधान, अर्थमंत्री, रिझर्व बँक ऑफ इंडिया यांना निवेदन


दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने पंतप्रधान, अर्थमंत्री, रिझर्व बँक ऑफ इंडिया, राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना दिलेल्या निवेदनात उद्योजकांच्या कर्जाचे हप्ते, त्यावरील व्याज व हप्ता भरायची मुदत डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. देशात अजूनही लॉकडाऊनची स्थिती असल्यामुळे व कोल्हापूर जिल्ह्यात दर आठ दिवसांनी लॉकडाऊन होत असल्यामुळे उद्योगधंदे बंद-चालू स्थितीत आहेत. देशातील वस्त्रोद्योगाची प्रमुख केंद्रे असलेल्या मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, सुरत, कोलकात्ता येथील बाजारपेठा अजूनही बंद आहेत. त्यामुळे असल्यामुळे कापडाला मागणी नाही. त्याचबरोबर मार्चपूर्वी विकलेल्या कापडाचे पेमेंट अजूनही व्यापार्‍यांकडून मिळत नाही. यंत्रमाग उद्योगातील परप्रांतीय कामगार गावी गेल्यामुळे उद्योग सुरु करणे अशक्य झाले आहे. अशा स्थितीत उद्योजकांना बँकांच्या कर्जाचे हप्ते व व्याज भरणे अशक्य आहे. म्हणूनच दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने पंतप्रधान, अर्थमंत्री, रिझर्व बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांना पत्रे पाठवून उद्योजकांच्या कर्जावरील व्याज व हप्ते भरण्याची मुदत 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविणेची मागणी केली आहे, अशी माहिती इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तात्रय कनोजे यांनी दिली.