Main Featured

टेन्शन वाढलं! कोल्हापूर जिल्ह्यात नवे ७७ रुग्ण पॉझिटिव्ह
New Kolhapur corona cases - कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे टेन्शन वाढत चाललं आहे. जिल्ह्यात आज शुक्रवारी आणखी ७७ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात अवघ्या १५ दिवसांत तब्बल २ हजारांहून अधिक रुग्णांची वाढ झाली आहे.


Must Read
आज शुक्रवारी आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील गंगावेश २ शास्त्रीनगर १, दिलबहार तालीम १, ताराबाई पार्क १, दसरा चौक १, बेलबाग १, रंकाळा १, जगताप नगर १, लाईन बाजार कसबा बावडा १,  शनिवार पेठ ३, विक्रम नगर २, आझाद चौक १, कदमवाडी १, शहर ५, फुलेवाडी १, राजारापूरी ३, बुधवार पेठ येथील १ रुग्णाचा समावेश आहे. 


New Kolhapur corona cases


करवीरमधील उजळाईवाडी १, प्रयाग चिखली १, वाकरे ३, नागाव १, कणेरी १, उचगाव २, साबळेवाडी १, गांधीनगर ८, हातकणंगलेतील इचलकरंजीत ८, भेडवडे १,  हातकणंगले १ आणि दतार मळा येथे १ रुग्ण सापडला आहे.

शाहूवाडीत १, गोंदोली १, कोतोली २, कागल २, शिरोळमधील औरवाड १, राधानगरी तालुक्यातील राशिवडे येथे ४, राधानगरीत १ , भुदरगडमध्ये १, पन्हाळा तालुक्यातील पार्ले येथे ४ रुग्ण आढळून आले आहेत. आणखी काही रुग्ण  संकेश्वर (कर्नाटक), सांगली, सावंतवाडी येथील आहे.

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत १५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. यात कोल्हापूर शहरातील ५ जणांचा समावेश आहे. तर काल दिवसभरात जिल्ह्यात एकूण २६३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ९६ बाधितांचा समावेश आहे.