Main Featured

भारतात 50 लोकांवर कोरोना लशीची चाचणी चाचणी, निकालानं अपेक्षा वाढल्या
कोरोना व्हायरसचं (#coronavirus) लस तातडीनं उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत. भारतात तयार होणाऱ्या पहिल्या (Covaxin first phase test successful) या लसीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 50 लोकांवर या लशीची मानवी चाचणी करण्यात आली होती. या लशीची पहिली मानवी चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. त्यानंतर शनिवारपासून रोहतक इथल्या तज्ज्ञ आणि शास्रज्ञांनी दुसऱ्या मानवी चाचणीचा टप्पा सुरू केला आहे.

Must Readऑक्सफोर्ड युनिवर्सिटीनं (Oxford University corona vaccine test)तयार केलेल्या लशीच्या पहिल्या दोन चाचणी यशस्वी झाल्या आहेत. तर तिसऱ्या टप्प्यात मुंबई-पुण्यादरम्यान 5000 लोकांवर मानवी चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती पुण्याच्या सीरम कंपनीच्या सीईओंनी दिली. त्यानंतर आता दुसरी आनंदाची बातमी म्हणजे भारतीय बनावटीची Covaxin ह्या लशीला मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात चांगलं यश मिळालं (Covaxin first phase test successful) आहे.
ICMR-भारत बायोटेक कंपनीने एकत्र येऊन Covaxin ही लस तयार केली आहे. एम्स रुग्णालयात Covaxin लशीची चाचणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात संस्थेला 100 स्वयंसेवकांची चाचणी घ्यावी लागते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली एम्सच्या चाचणीत भाग घेण्यासाठी सुमारे 3500 लोकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये 50 टक्क्यांहून अधिक लोक दुसऱ्या राज्यातील असल्याची माहिती मिळाली आहे.
शुक्रवारी एका व्यक्तीला Covaxinची लस देण्यात आली. त्यावर दोन तासांत कोणतीही रिअॅक्शन दिसून न आल्यामुळे दोन तासात घरी सोडण्यात आलं आहे. ज्या लोकांना लस देण्यात आली आहे त्यांना एक डायरीही देण्यात आली आहे. यामध्ये त्यांना लस दिल्यानंतर झालेले बदल किंवा होणाऱ्या रिअॅक्शनच्या नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 50 लोकांना लस दिल्यानंतर कोणतीही रिअॅक्शन न आल्यानं आता दुसरा टप्पा सुरू करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.