Main Featured

या राज्यात काँग्रेसला झटका, ६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश


या राज्यात काँग्रेसला झटका, ६ नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची डोकेदुखी वाढली असताना इम्फाळ महानगरपालिकेतील काँग्रेसचे ६ तर नॅशनल पीपल्स पार्टीच्या (एनपीपी) एका नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. (6-congress-corporators-join-bjp) मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह आणि भाजप प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला. 
मुख्यमंत्र्यांनी या सर्व नगरसेवकांचं पक्षात स्वागत केलं. राज्यातील भाजप सरकारच्या चांगल्या कामांमुळे नगरसेवक भाजपमध्ये आल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
Must Read
1)कोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याचा नशेत धिंगाणा, पळून जाण्याची धमकी

2)बापरे! क्वारंटाइन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या जेवणाचं बिल आलं 50 लाख, पैसे भरणार कोण?

3)मुंबईत कोरोनाची साथ आटोक्यात- इकबाल चहल

4)रियाकडून सुशांतचा छळ, त्याला ब्रेकअप करायचा होता; अंकिताचा धक्कादायक खुलासा

5)आणखी एक दिलासा देणारी बातमी! देशात 10 लाखहून अधिक रुग्णांचा कोरोनाविरुद्ध लढा यशस्वी
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी लवकरच आणखी काही नेते भाजपमध्ये येतील असा दावा केला आहे. २७ सदस्य संख्या(6-congress-corporators-join-bjp) असलेल्या इम्फाळ महानगरपालिकेत काँग्रेसचे १२, भाजपचे १०, अपक्ष ४ तर एनपीपीचा एक नगरसेवक आहे. काँग्रेसने ४ अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. काँग्रेसचे एल. लोकेश्वर इम्फाळ महानगरपालिकेचे महापौर आहेत. पण ६ नगरसेवकांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची सत्ता संकटात सापडली आहे.