Main Featured

कोल्हापुरात सात तर इचलकरंजीत 5 नवे रुग्णkolhapur district corona infected case

जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या सोळा नव्या रुग्णांची भर पडली. कोल्हापूर शहरात 7 तर इचलकरंजी शहरात आणखी पाच रुग्ण आढळून (kolhapur district corona infected case)आले आहेत. दिवसभरात तीन जण कोरोनामुक्‍त झाल्याने पूर्णत: बरे झालेल्यांची संख्या 732 वर गेली आहे.

मिरज येथे दाखल करण्यात आलेल्या जिल्ह्यातील आणखी तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.मूळचे कुरुंदवाड येथील असलेले आणि सध्या म्हैसाळ येथे कार्यरत असलेल्या डॉक्टरलाही लागण झाली आहे.

इचलकरंजी शहरात आज आणखी पाच रुग्ण वाढले. गुरुकन्नन नगर येथील 35 वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यासह कलानगर येथील 45 वर्षीय पुरुष तर महात्मा गांधी हौसिंग सोसायटी परिसरातील 55 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. रात्री उशिरा आणखी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या पाच रुग्णांमुळे इचलकरंजीतील बाधितांची संख्या 52 झाली.


Must Read


आजरा तालुक्यातही आज तीन नव्या रुग्णांची भर पडली. भादवण येथील 18 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यास भादवणवाडी येथील 38 वर्षीय पुरुष आणि 28 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झाली आहे. रात्री उशिरा शहरातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. राजारामपुरी येथे 25 आणि 23 वर्षीय युवतींचा अहवाल पॉझिटिव्ह आला.


न्यू शाहूपुरी येथील 27 वर्षीय तरुणासह राजोपाध्ये नगर येथील 25 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह 29 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला आणि 7 वर्षाच्या बालिकेचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर सातारा जिल्ह्यातील आणखी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या सोळा रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 904 पर्यंत गेली आहे.

जिल्ह्यातील काहींना (kolhapur district corona infected case) मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी आज तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामध्ये कुरुंदवाड येथील लक्ष्मीनगरातील 28 वर्षीय डॉक्टर आणि त्याच्या भावालाही कोरोनाची लागण झाली आहे. हा डॉक्टर सांगली जिल्ह्यातील ढवळी येथे कार्यरत होता, सध्या त्याची ड्युटी म्हैसाळ येथे होते, त्यातून तो बाधित झाला आहे.

कुंभोज (ता. हातकणंगले) येथील 24 वर्षीय तरुणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे तीनही रुग्ण सध्या मिरज येथे उपचार घेत असल्याने त्यांची नोंद सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या यादीत झाली आहे. यामुळे जिल्ह्यात आज प्रत्यक्षात नऊ रुग्ण आढळून आले.

कोल्हापूर शहरातील जवाहरनगर परिसरातील पती-पत्नी गुरुवारी बाधित आढळले आहेत. ते दोघे व्हीनस कॉर्नर-कोंडा ओळ रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे ते उपचार घेत असलेली रुग्णालयातील खोली शुक्रवारी सील करण्यात आली, तर तीन डॉक्टरसह दहा कर्मचार्‍यांना क्‍वारंटाईन करण्यात आले आहे.