Main Featured

इचलकरंजी शहरात आणखी दोन कोरोना रुग्णांची आज भर

इचलकरंजी शहरातील आणखी दोन कोरोना रुग्णांची (corona positive)आज भर पडली. यामध्ये क्रिगीस्तान देशातून आलेल्या विद्यार्थ्याचा समावेश आहे. तर दुसरी व्यक्ती येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. या व्यक्तीचा खासगी प्रयोगशाळेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

शहरात मंगळवारी कुडचे मळ्यातील एक 55 वर्षीय रुग्ण आढळून आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा स्वॅब घेण्यात आले असून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. हा परिसर आज सकाळी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून सील करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरु होता. त्याच दरम्यान शहरातील आणखी दोघेजण कोरोनाबाधीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासन हबकले आहे.


Must Read

यातील एकजण विद्यार्थी आहे. तो क्रिगीस्तान देशातून आला आहे. त्याला आयजीएम रुग्णालयातील विलगीकरण कक्षात मंगळवारी दाखल करण्यात आले होते. त्याच्या स्वॅबचा अहवाल आज सकाळी पॉझीटीव्ह (corona positive)आला. त्याला तातडीने सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. तो स्थानिक कोणाच्याही संपर्कात आला नसल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले. तो मॉडर्न हायस्कूल परिसरातील एका इमारतीत राहतो.

या शिवाय येथील खासगी रुग्णालयात एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मात्र हा रिपोर्ट खासगी प्रयोग शाळेतील आहे. या रुग्णाची माहिती घेण्याचे काम प्रशासनाकडून सुुरु होते. त्याचा पून्हा एकदा स्वॅब शासकीय प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तो दातार मळा परिसरातील रहिवाशी आहे. त्याला डेंगी सदृश्य आजाराची लागण झाल्याची शक्यता गृहीत धरुन खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रवासाचा इतिहास तपासण्याचे काम प्रशासनाकडून सुरु होते.

Post a Comment

0 Comments