Main Featured

Breaking News : इचलकरंजीकरांसाठी मोठा धक्का
इचलकरंजी येथे आज दिनांक 26 जून रात्री सव्वाआठच्या सुमारास आलेल्या माहितीनुसार सात रुग्ण पॉझिटिव्ह आल्याचे समजते, त्यानंतर रात्री पुन्हा सव्वानऊला आलेल्या रिपोर्टमध्ये नऊ जण पॉझिटिव आले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण रुग्णांची संख्या 797 झाली आहे. तर आज दिवसभरात सकाळी आठ ते रात्री साडेनऊ पर्यंत एकूण 19 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

रात्री साडेनऊला आलेल्या रिपोर्ट मधील नऊ रुग्णांपैकी आठ जण हे इचलकरंजी येथील कुडचे मळा व बंगला रोड येथील आहेत. तर एक जण कोल्हापूर शहरातील आहे. त्यामुळे इचलकरंजी शहरातील नागरीकांना अतिशय मोठा धक्का बसला आहे. कुडचे मळा व बंगला रोड या परिसरात कम्युनिटी स्प्रेड झाल्याची शंका आहे या परिसरात हॉटस्पॉट चे नियम लागू करण्यात येणार असल्याचे समजते.


Post a Comment

0 Comments