Main Featured

शहरातील कोरोनाबाधितांची मालिका कायम


CORONAVIRUS LIVE UPDATES: Kansas adds 118 new coronavirus cases ...मागील आठवड्यापासून सुरु असलेली शहरातील कोरोनाबाधितांची मालिका कायम असून शहरातील कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या 37 वर पोहोचली आहे. काल रात्री उशीराप्राप्त अहवालात कुडचे मळा परिसरातील दोघे आणि जुना चंदूर रोड व गुरुकन्नननगर परिसरातील एक अशा चौघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 14 वर्षाचा मुलगा, 5 वर्षाची मुलगी आणि 45 वर्षीय महिला व 39 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर एका 65 वर्षीय वृध्दाचा मृत्यूपश्‍चात अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अहवाल पॉझिटीव्ह आल्याने वृध्दाच्या अंत्यविधीसाठी हजर असलेल्या 12 जणांना प्रशासनाने खबरदारी म्हणून ताब्यात घेतले. तर उर्वरीत चार बाधितांच्या संपर्कातील 45 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले आहेत.येथील गावभागातील त्रिशुल चौक परिसरातील वृध्दाची प्रकृती बिघडल्याने त्यांना इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ठिकाणी त्यांचा स्त्राव घेऊन प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी उपचार सुरू असताना त्यांचा सोमवारी दुपारीच्या सुमारास मृत्यू झाला. रुग्णालय प्रशासनाने आवश्यक ती काळजी घेत वृध्दाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. त्यानंतर येथील पंचगंगा स्मशानभूमीत नातेवाईकांनी वृध्दाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही केले.


त्यानंतर रात्री उशीरा संबंधित वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाल. प्रशासनाने हालचाली करत स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या जवळपास 20 जणांना तेथून रोखून धरले. त्या सर्वांची तपासणी करुन त्यातील 12 जणांचे स्त्राव घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. तर रात्री उशीरा आणखीन चौघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांचीच तारांबळा उडाली. त्यामध्ये कुडचे मळा परिसरातील दोघांचा आणि गुरुकन्नननगर व जुना चंदूर रोड परिसरातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
प्रशासाने तातडीने उपाययोजना राबवत गुरूकन्ननगर, जुना चंदूर रोड आणि त्रिशुल चौक परिसर सील केला. तसेच या भागात औषध फवारणी करण्यासह आरोग्य विभागाकडून थर्मल स्कॅनिंगद्वारे प्रत्येक घरातील व्यक्तीची तपासणी केली आहे. दरम्यान, प्रलंबित अहवालापैकी मंगळवारी सकाळी प्राप्त 11 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर नव्याने आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील 45 जणांचे स्त्राव तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यांच्या अहवालाकडे लक्ष लागून राहिले आहे.

Post a Comment

0 Comments