Main Featured

क्वारंटाईन सेंटरमधून दाम्पत्याचे पलायन


यड्राव परिसरातील अल्फोन्सा स्कूल या कोविड 19 सेंटरमधून एका दाम्पत्याने पलायन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हे दाम्पत्य सावंतवाडी येथून आले होते. मागील दोन दिवसांपासून त्यांची शोधाशोध केली जात आहे. मात्र ते मिळून आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांत घबराट निर्माण झाली आहे.कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर परगांवाहून येणार्‍या नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील डिकेटीई व अल्फोन्सा स्कूल या दोन कोविड 19 सेंटरमध्ये अलगीकरण केले जाते. 26 जून रोजी सावंतवाडी येथून आलेल्या एका दाम्पत्याला कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते.

29 जून रोजी पहाटेच्या सुमारास केंद्रातील नागरिकांची पाहणी केली जात असताना सदरचे दाम्पत्य केंद्रात नसल्याचे निदर्शनास आले. कोविड केंद्रात असलेल्या कर्मचार्‍यांची नजर चुकवून या दाम्पत्याने केंद्रातून पलायन केल्याचे उघडकीस आले. या संदर्भातील अहवाल नगरपालिकेच्या आरोग्य विभागाला सादर करण्यात आला आहे. मागील दोन दिवसांपासून या दाम्पत्याचा शोध घेतला जात आहे. परंतु अद्यापही ते मिळून आलेले नाही. हे दाम्पत्य गावभागातील असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

0 Comments