Main Featured

इचलकरंजीत पुन्हा लॉकडाऊन?इचलकरंजीत काल व परवा असे मिळून सलग दोन दिवस नवीन चार रुग्ण व इचलकरंजी परिसरातीलच हुपरी, रेंदाळ येथे प्रत्येकी एक असे दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे इचलकरंजी परिसरातील नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या सहा झाली. अशातच कुडचे मळा येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सीपीआर मधून इचलकरंजीत पुन्हा दाखल झाल्याने शहरात काल प्रशासनाची तारांबळ उडाली. तसेच नागरिकात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले.अचानक या दोन दिवसात या दोन मोठ्या घडामोडी घडल्याने पालिकेने आज तातडीची बैठक बोलावली. 

या बैठकीत शहरातील फेरीवाले, गाडीवाले, पान टपरी, चहा नाष्टा हे सर्व बंदच राहणार, याच बरोबर ज्या ठिकाणी गर्दी होईल अशी सर्व ठिकाणी बंद राहणार, कंटेनमेंट झोनमधील व्यवहार शंभर टक्के बंद राहणार, सायंकाळी पाच ते पहाटे पाच पर्यंत संचारबंदी राहणार असे निर्णय इचलकंजी शहरासाठी घेण्यात आले.ही बैठक नगराध्यक्ष सौ अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी घेतली. 


बैठकीस आमदार प्रकाश आवाडे, प्रांताधिकारी विकास खरात, उपनगराध्यक्ष तानाजी पवार, पोलीस उपअधीक्षक गणेश बिरादार, सागर चाळके, मदन कारंडे, शशांक बावचकर, यांच्यासह सर्व नगरसेवक, पत्रकार उपस्थित होते.दरम्यान शहरात दोन दिवस झालेल्या घडामोडींमुळे इचलकरंजीत पुन्हा लॉकडाऊन वाढणार, अनेक नियम कडक होणार अशा नव्या चर्चांना, अफवांना उत आली होती. पालिकेच्या आजच्या या बैठकीनंतर या सर्व अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Post a Comment

0 Comments